वृत्तसंस्था/टोरंटो
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर लॉरेन्स बिश्नोई टोळीने हल्ला केला आहे. गेल्या चार महिन्यांत कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या गोल्डी ढिल्लन आणि कुलदीप सिद्धू यांनी सोशल मीडियावर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या कॅनडास्थित कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अलिकडच्या काळात कपिल शर्माच्या कॅनेडियन कॅफेवर अनेक वेळा हल्ला करण्यात आला आहे.









