“पुढच्या ८ तासात”….. पोलिस अलर्ट मोडवर
मुंबई
कॉमेडीय कपिल शर्माला एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फक्त कपिल शर्माच नाही तर, त्याच्या कुटुंबातील सदस्य, त्याच्या सोबत काम करणारे सहकलाकार या सर्वांना जीवे मारू, अशी धमकी कपिल शर्माल याला देण्यात आली आहे.
हा प्रकरा उघडकीस आल्यानंतर आंबोली (मुंबई) येथील पोलिस ठाण्यात कलम ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. कपिल शर्माच्या आधी, अभिनेता राजपाल यादव, रेमो डीसूझा, कॉमेडीयन सुगंधा मिश्रा यांनाही या प्रकारचे धमकीचे ईमेल आलेले आहेत.
कपिल शर्मा ला आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये त्याच्यासह, त्याने नातेवाई, कुटुंबिय, सहकारी, शेजारी या सर्वांना जीव मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. या ईमेल आयडीवरून धमकीचा ईमेल आला आहे, त्या मेल आयडीचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानचा असल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप कपिल आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया आलेली नाही.
“आम्ही हे सगळं पब्लिसिटीसाठी करत नाही आहे. तुमच्या सर्व अॅक्टीव्हीवर आमची नजर आहे. पुढच्या ८ तासात तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. जर आम्हाला कोणतही उत्तर मिळालं नाही, तर तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही असे आम्ही गृहीत धरु, अशी धमकी कपिल शर्माला देण्यात आली आहे.”
Previous Articleपाणलोट यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावागावात जनजागृती
Next Article अतिक्रमण निघाले, आता पार्किंग नियोजन करा









