वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील भाजप नेते कपिल मिश्रा यांना पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे ट्विट करत सांगण्यात आले आहे. कपिल मिश्रा यांची दिल्लीतील प्रतिमा फायरब्रँड नेते अशी आहे. आम आदमी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले मिश्रा हे अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेचा भडिमार करत असतात. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मिश्रा हे दिल्लीच्या करावल नगर मतदारसंघाचे आमदार होते.
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी या जबाबदारीसाठी मला योग्य समजल्याने मी त्यांचे आभार मानतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनात दिल्ली मोठ्या परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी मला स्वत:च्या टीममध्ये स्थान दिल्याने मी त्यांचेही आभार मानतो असे मिश्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे.









