वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राजधानी दिल्लीतील अंजली कंझावला हिट अँड रन प्रकरणी गुरुवारी रोहिणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश जारी केले. त्यानुसार अमित खन्ना, कृष्णा, मनोज मित्तल आणि मिथुन यांच्यावर हत्येच्या कलमांखाली खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे चारही आरोपी त्या रात्री कारमध्ये हजर असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. 1 जानेवारी 2023 रोजी नववर्षाच्या रात्री एका मुलीच्या स्कूटीला कारने धडक दिल्यानंतर सदर मुलगी कारखाली अडकली होती. अपघातानंतरही गाडीतील तऊण खाली न उतरता 12 किलोमीटरपर्यंत गाडी चालवत राहिल्याने तऊणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाशी संबंधित आरोपींवर हत्येबरोबरच 201 (पुरावा नष्ट करणे), 212 (गुन्हेगारीला आश्र्रय देणे), 120बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. तर अमित नामक आरोपीवर निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









