हॉस्पिटलमधून शेअर केले मुलीचे छायाचित्र
‘हंगामा-2’ या चित्रपटातील अभिनेत्री प्रणिता सुभाष आणि तिचा पती नितिन राजू हे एका मुलीचे पालक झाले आहेत. यासंबंधीची माहिती प्रणिताने स्वतः सोशल मीडियावर काही छायाचित्रे शेअर करत दिली आहे.
‘मागील काही दिवस माझ्यासाठी अत्यंत चांगले राहिले आहेत, आमच्या मुलीचा जन्म झाल आहे. माझ्याकडे एक स्त्राrरोग तज्ञ आई (डॉ. जयश्री) असल्याने मी खरोखरच सुदैवी आहे. परंतु माझ्यासाठी भावनिकदृष्टय़ा हा सर्वात कठिण काळ होता असे तिने नमूद केले आहे.

डॉक्टरांच्या टीमचे मी आभार मानू इच्छिते. या डॉक्टरांनी या पूर्ण प्रक्रियेदरम्यान माझी काळजी घेतली. माझी बर्थ स्टोरी तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी आणखीन प्रतीक्षा करू शकत नाही असे प्रणिताने म्हटले आहे.
प्रणिताने उद्योजक नितिन राजू यांच्याशी मागील वर्षी विवाह केला होता. दोघांच्या विवाहसोहळय़ात कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवारच सहभागी झाला होता. प्रणिताने चालू वर्षी एप्रिलमध्ये स्वतः गरोदर असल्याचे सांगितले हेते.
प्रणिता यापूर्वी अजय देवगण सोबत ‘भुज ः द प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘हंगामा 2’ या चित्रपटात दिसून आली होती. प्रणिताने आतापर्यंत अनेक तमिळ, तेलगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 2010 मध्ये ‘बावा’ या चित्रपटाद्वारे तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. दक्षिणेत प्रणिताने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.









