वार्ताहर /कंग्राळी खुर्द
येथील शिवमूर्ती, महात्मा फुले मंगल कार्यालयाजवळील रस्त्यावर पडलेले खड्डे ग्राम पंचायतीने बुजविल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कंग्राळी खुर्द गावच्या प्रवेशद्वारातील अश्वारूढ शिवमूर्ती परिसरात विशेषत: मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षपणामुळे या रस्त्यावर हे खड्डे पडले होते. अनेक ख•dयांच्या साम्राज्यामुळे हा मुख्य रस्ताच आपले अस्तित्व गमावून बसला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून ख•dयांतूनच वहानचालकांना ये-जा करावी लागत होती. शिवाय ख•dयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना याचा अंदाज येत नव्हता. यामुळे गाड्या घसरून पडणे, वारंवार वाहने नादुरूस्त होणे यामुळे प्रवाशांना वैताग आला होता. मात्र ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड झाली. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून कल्लाप्पा पाटील यांनी कार्यभार घेताच शिवमूर्ती परिसर, महात्मा फुले मंगल कार्यालय आणि ज्योतीनगर येथील जनलोकसेवा मंगल कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील ख•s बुजविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









