लायब्ररीही उद्घाटनच्या प्रतीक्षेतच : उलटसुलट चर्चा : अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथे शासकीय निधीतून गेल्या पाच वर्षापूर्वी बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कन्नड शाळेमध्ये बांधण्यात आलेली लायब्ररी सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. यासाठी शासनाने लाखो रूपये खर्च केले आहेत. परंतु बांधून पाच वर्षे लोटली तरी शासनाला उद्घाटनाचा मुहूर्त सापडेना याबद्दल नागरिकांतून उलटसुलट चर्चा होत आहे. संबंधित खात्याच्या वरील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी बांधलेल्या या दोन्ही संकुलनाचे उद्घाटन करून नागरिकांच्या उपयोगास अनुकूल करण्याची मागणी ग्रामस्थातून करण्यात येत आहे. गावची लोकसंख्या 25 ते 30 हजाराच्या घरात आहे. लोकसंख्येने एवढे मोठे गाव असून देखील नागरिकांना एखादी आरोग्य समस्या उद्भवल्यास कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास करून जावे लागत होते. कडोलीत जाऊन तेथे डॉक्टर नसेल तर पुन्हा वापस येणे यामुळे आजारावर परिणाम होत होता. याचा सारासार विचार करून शासनाने कंग्राळी बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची शाखा सुरू करण्यासाठी इमारत तयार केली.
प्राथमिक आरोग्य केंद्र शाखेसाठी 34 लाख रुपये निधी
गावातील नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य सेवेची गावातच सोय व्हावी या उद्देशाने स्मार्ट व्हिलेज निधीतून 34 लाख रुपये मंजूर झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करून पाच वर्षे उलटली परंतु अजून उद्घाटनच झाले नसल्यामुळे शासनाने तयार केलेले प्राथमिक आरोग्य केंद्र कुचकामी ठरले आहे. शासकीय अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.
40 लाख रुपये लायब्ररीसाठी खर्च
नागरिकांना वाचनाची आवड लागावी, करण्यासाठी कन्नड शाळा आवारात शासनाने स्मार्ट व्हिलेज फंडातून 40 लाख रुपये निधी खर्च करून सुसज्ज लायब्dरारीची बांधली आहे. या लायब्ररीचेही अजून उद्घाटन न झाल्यामुळे नागरिकांच्यासाठी सदर लायब्dरारी कुचकामी ठरल्याचे नागरिक व शिक्षणप्रेमींतून बोलले जात आहे. तेव्हा लोकप्रतिनिधी, ग्रा. पं. व संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष देऊन दोन्ही इमारतींचे त्वरित उद्घाटन करून दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.









