मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी ख•s-पाण्याची डबकी : रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक-शाहूनगरपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे ख•s पडून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. याच रस्त्यावर पंचायत सदस्यांची ये-जा असूनसुद्धा रस्ता दुरुस्त होत नाही, अशा संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. भागातील लोकप्रतिनिधींनी तरी इकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. ग्रामीणच्या आमदार व कॅबिनेट मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निधीतून गेल्या पाच वर्षापूर्वी सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. सदर रस्त्यावर प्रवासीवर्गाची मोठी वर्दळ असते. याच रस्त्यावर केएलईमार्गे व शाहूनगरमार्गे परिवहन मंडळाने बसेस सोडून नागरिकांसह विद्यार्थीवर्गाची सोय केलेली आहे. परंतु खाचखळगे पडलेल्या रस्त्यावर बसेस चालवताना बसचालकांनासुद्धा मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच चारचाकी, दुचाकी, वाहनधारकांनासुद्धा कसरत करावी लागत आहे. रस्ता दुरुस्ती संदर्भात अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध होऊनसुद्धा ग्रा. पं. व वरिष्ठ शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी डोळे झाकूनच असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
…अन्यथा वनमहोत्सव साजरा करू
शाहूनगरपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे ख•s पडले आहेत. आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे पावसाचे पाणी साचल्यामुळे पाण्याची डबकी तयार झाली आहेत. वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ख•dयातील पाणी अंगावर उडत असून ख•s चुकविण्याच्या नादात दुचाकी वाहनधारकांचे अपघात घडत आहेत. तेव्हा वरिष्ठांनी रस्ता दुरुस्ती करून वाहतुकीला सुरळीत करावा, अन्यथा रस्त्यावरील ख•dयांमध्येच रोपे लावून वनमहोत्सव साजरा करण्याचा इशारा नागरिक व प्रवासी वर्गाकडून देण्यात आला आहे.









