वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथील विश्व भारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय व गर्ल्स हायस्कूलच्या 2023-24 शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडास्पर्धा 18 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या. अध्यक्षस्थानी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एम. हुलगबागी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. सदस्य दादासाहेब भदरगडे, उद्योजक किरण तरळे उपस्थित होते. क्रीडा शिक्षिका प्रियांका कदम यानी प्रास्ताविक केले. तर मुख्याध्यापक एन.के. पाटील यांनी परिचय व स्वागत केले. उपस्थित मान्यवरांचे शालेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उद्योजक किरण तरळे यांच्याहस्ते सरस्वती फोटो पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले. तर ग्रा. पं. सदस्य दादासाहेब भदरगडे यांच्याहस्ते क्रीडागणांचे पुजन करून फित कापून क्रीडास्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळामध्येही प्राविण्य मिळविणे गरजेचे आहे. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात जिद्द व चिकाटीचे ध्येय समोर ठेवून मार्गक्रमण केल्यास यशाचे शिखर गाठून यशस्वी होण्याचे विचार व्यक्त करण्यात आले.









