मेगाबजेट चित्रपटात दिसणार दिग्गज कलाकार
कंगना रनौत अन् विजय सेतुपति हे दोघेही दिग्गज लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. प्रॉडक्शन कंपनी अहिंसा एंटरटेन्मेंट आणि ट्रिडेंट आर्ट्सने ही माहिती दिली आहे. कंगना अन् विजयचा हा चित्रपट देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. याचे चित्रिकरण लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.

दाक्षिणात्य अन् बॉलिवूडमधील दोन सुपरस्टार्स मिळून एका मेगाप्रोजेक्टवर काम करणार आहेत. हा चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलर धाटणीचा असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले. चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले असून यात एक जुनी म्युझिक टेप, एचडीएमआय केबल, गन आणि बुलेट दिसून येत आहे.

कंगना रनौतचे चालू वर्षात तेजस, इमर्जन्सी आणि चंद्रमुखी 2 हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याचबरोबर कंगना ही एका चित्रपटात सीतामातेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. तर विजय सेतुपति लवकरच शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर मेरी ख्रिसमस या चित्रपटात तो कॅटरिना कैफसोबत झळकणार आहे.









