खासदारकीच्या याच कार्यकाळात उरकणार विवाह
कंगना रनौत सध्या इमरजेंसी या चित्रपटावरून चर्चेत आहे. याचदरम्यान कंगनाने आता स्वत:च्या विवाहावरून मौन सोडले आहे. एका मुलाखतीत तिने आपण कधी विवाह करणार यासंबंधी सांगितले आहे. मी विवाह करू इच्छिते. खासदारकीच्या याच कार्यकाळात माझा विवाह होण्याची शक्यता आहे, कारण त्यानंतर विवाह करण्याचा कुठलाच लाभ नाही असे कंगनाने म्हटले आहे. कंगनाने यापूर्वी देखील विवाह करण्याचे संकेत दिले होते. कंगना सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याचीही चर्चा सुरू आहे. परंतु ती कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे याची माहिती स्पष्ट झालेली नाही. कंगना रनौत चित्रपट ‘इमरजेंसी’मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिनेच केले आहे. तसेच कंगनाने अलिकडेच स्वत:चा आगामी चित्रपट भारत भाग्य विधाताची घोषणा केली आहे.









