वृत्तसंस्था/ ऑकलंड
केन विल्यम्सनसाठी आयपीएल 2023 ची सुरुवात खूप वाईट ठरली. कारण विल्यमसनला पहिल्याच सामन्यात अशी दुखापत झाली होती, त्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला होता आणि 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतही खेळणे त्याच्यासाठी अशक्य आहे. विल्यमसनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. मात्र, आता हा खेळाडू दुखापतीनंतरही विश्वचषकासाठी भारतात येणार असल्याची बातमी आहे.
केन विल्यम्सन एक खेळाडू म्हणून नाही तर संघाचा मार्गदर्शक म्हणून किवी संघासोबत राहणार आहे. विल्यमसनकडे प्रदीर्घ अनुभव आहे, तो विश्वचषकासारख्या स्पर्धेत आपल्या सहकारी खेळाडूंना मदत करू शकतो. त्याचा सल्ला संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. गेल्या विश्वचषकात त्यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली होती, पण शेवटी इंग्लंड विश्वविजेता बनण्यात यशस्वी ठरला होता. तसे, न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी केन विल्यमसनवरील आशा सोडलेली नाही. विल्यमसन विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होवू शकतो, असे गॅरी स्टेडला अजूनही वाटते. मात्र, तसे झाले नाही, तर तो संघासोबतच राहणार असून मार्गदर्शन करण्याचे त्याचे काम असेल.