वृत्तसंस्था / पुणे
भारतीय संघाबरोबर येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंड संघातील वरिष्ठ खेळाडू आणि माजी कर्णधार केन विल्यम्सन दुखापतीमुळे खेळू शकणार नाही,, असे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात असून न्यूझीलंडने बेंगळूरची कसोटी जिंकून भारतावर आघाडी घेतली आहे. पुण्यातील दुसरी कसोटी येत्या गुरुवारपासून सुरु होईल. या कसोटी मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी मुंबईत 1 नोव्हेंबरपासून खेळविली जाईल.









