वृत्तसंस्था/ अहमदाबाद
न्यूझीलंडचा फलंदाज केन विलियम्सन याला दुखापत झाल्याने तो सध्या सुरू असलेल्या 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही अशी माहिती गुजरात टायटन्सच्या व्यवस्थापकाकडून देण्यात आली.
आयपीएल स्पर्धेसाठी विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने केन विलियम्सनला खरेदी केले होते. गेल्या शुक्रवारी झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळताना विलियम्सनला ही दुखापत झाली होती. या सामन्यात झेल टिपण्याच्या प्रयत्नात त्याच्या उजव्या पायच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीतून तो लवकर बरा होणे अशक्य असल्याने त्याला या स्पर्धेला मुकावे लागत असल्याचे गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोळंकी यांनी सांगितले. विलियम्सन या दुखापतीवर वैद्यकीय इलाज करवून घेण्यासाठी मायदेशी रवाना होणार आहे.









