महाराष्ट्रातील आंदोलनाचा फटका : कांद्यामुळे सर्वसामान्यांना त्रास :1500 ते 2800 पर्यंत दर : अजूनही दर वाढण्याची शक्यता
बेळगाव : रोजच्या स्वयंपाक घरातील कांद्यामुळे सर्वसामान्यांचा वांदा सुरू आहे. सध्या बेळगाव शहर तसेच देशातही कांद्याचा दर भडकला असून या कांद्याची झळ मात्र सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे. पावसाअभावी कांदा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका आता बेळगावकरांनाही बसत आहे. त्यामुळे काहीसा दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या बेळगाव एपीएमसीमध्ये 1500 ते 2800 रुपयांपर्यंत कांद्याचा दर आहे. मात्र तो आता 3 हजारांवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे तोवर दर चढेच राहणार आहे. आवक कमी झाल्याने कांद्याचा दर भडकला असून, बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्यातून केवळ दोनच दिवस कांदा बाजारत येवू लागला आहे. यामुळे किरकोळ विक्रेते आणि होलसेल विक्रेत्यांमध्ये सुमारे 10 ते 13 ऊपयांचा फरक दिसून येवू लागला आहे. काही दिवसांपासून कांद्याचा दर भडकला आहे. अचानक आवक कमी झाल्याने कांदा उच्चांक गाठणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उत्तम दर्जाचा कांदा प्रति क्विंटल 2800 ऊपयांपर्यंत उपलब्ध होऊ लागला आहे. दोन नंबरचा कांदा 2 हजार, तीन नंबरचा 3 हजार ते 1500 ऊपयांपर्यंत उपलब्ध आहे. काही दिवसांपासून काद्याने वांदा केला असला तरी प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात कांदा हवाच हवा. यामुळे कितीही महाग का होईना कांदा घेणे हे गरजेचेच असल्याचे मत अनेकांतून व्यक्त होऊ लागले आहे.
योग्य भाव मिळेपर्यंत आंदोलन सुरूच
सध्या बाजारपेठेत तीन नंबरचा कांदा उपलब्ध करण्यात येतो. चांगला कांदा किरकोळ विक्रेते सुमारे 25 ते 30 ऊपये प्रतिकिलो विकत आहेत. एपीएमसीमध्ये आठवड्यातून केवळ दोन वेळाच कांदा उपलब्ध होत होता. मात्र आता तोही बंद झाल्याची माहिती मिळाली आहे. कारण महाराष्ट्र येथे कांदा शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले असून, जोवर योग्य भाव मिळणार नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे बेळगावात कांद्याचा दर वाढण्याची शक्यता आहे.
गोव्याला कांद्याची वाहतूक होत असल्याने परिणाम
एपीएमसीमध्ये सध्या अजून महिन्याभर महाराष्ट्राचाच कांदा येतो. गणेशोत्सवानंतर स्थानिक व कर्नाटकी कांदा येण्यास सुरूवात होते. मात्र तोपर्यंत कांद्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान बुधवार आणि शनिवारी केवळ दोनच दिवस कांदा उपलब्ध करून देण्यात येवू लागला आहे. यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसून येत आहे. बेळगाव येथील एपीएमसीतून गोव्याला कांदा पाठविण्यात येतो. गोव्याला पाठविण्यात येत असल्याने येथील ग्राहकांनाही याचा भार सोसावा लागत आहे. रविवार पेठ येथे कमी दर्जाचा कांदा उपलब्ध होत असून, तो 25 ते 35 ऊपये प्रतिकिलो विक्री करताना दिसून येत आहे. आता तोही कांदा संपत आला असून यापुढील काळात ही परिस्थिती अशीच राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आणखी काही दिवस त्रास सोसा
आता बेळगाव बाजारपेठेत नवीन कांदा उपलब्ध आहे. कर्नाटकातील मुद्देबिहाळ, बागलकोट, लिंगसूर भागातून कांदा येत नसल्यामुळे याचा फटका ग्राहकांना सोसावा लागतो. महाराष्ट्रातील नाशिक व अहमदनगरसह इतर जिल्ह्dयातून बेळगावला कांदा आणण्यात येतो. मात्र सध्या महाराष्ट्रातही आंदोलन सुरू असल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस त्रास सहन करावा लागणार यात शंका नाही.









