तीन दिवस भक्तांची गर्दी : विविध मठाधीशांची विशेष उपस्थिती
वार्ताहर/ किणये
कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिराचा वास्तुशांती, कळसारोहण व उद्घाटन सोहळा उत्साहात झाला. मंगळवारी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली. सिद्धेश्वर डोंगर परिसरात मंगळवारी दिवसभर टाळ-मृदंग, पारंपरिक वाद्यांच्या गजरासह हर हर महादेवाचा गजर झाला.
गावातील जागृत सिद्धेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा तीन दिवस आयोजित करण्यात आला होता. रविवारी गावात कलश मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावभर ही मिरवणूक झाली. रात्री सिद्धेश्वर मंदिरात जागर भजनाचा कार्यक्रम झाला. सोमवारी मंदिरात होमहवन व पूजाविधी कार्यक्रम पार पडले.

मंगळवारी या सोहळ्याचा मुख्य दिवस होता. सकाळी गावातील लक्ष्मी मंदिर येथे विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर गो-मातेसह मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सुवासिनी डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.
मंदिरात पुजारी व विविध मठांच्या मठाधीशांच्या हस्ते पूजाविधी करून गो-माता पूजन करण्यात आले. त्यानंतर गणहोम करण्यात आला. नागनूर मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी, कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामी, हंदिगुंद येथील सिद्धेश्वर मठाचे शिवानंद महास्वामी, मडिवाळ राजयोगेंद्र महास्वामी, दूरदुंडेश्वर गुरुबसवलिंग महास्वामी, विरक्तमठाचे डॉ. महांतप्रभू महास्वामी आणि कारंजीमठ बेळगावचे शिवयोगी देवजी आदींच्या दिव्य सान्निध्यात मंदिराचे कळसारोहण करून पूजन करण्यात आले.
एन. एस. चौगुले, शिवाजी सुंठकर, संजय सुंठकर, सिद्राय सांबरेकर, आप्पय्या बिरजे, भावकाण्णा हिरोजी, बसवाणी भंटरगाळी, अर्जुन मुचंडीकर, मारुती पुजारी आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. मंदिर उद्घाटन सोहळ्याला आमदार अनिल बेनके, महापौर सोमणाचे, उपमहापौर पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शविली होती. सिद्धेश्वर मंदिर जागृत असल्यामुळे दर्शनासाठी भक्तांनी मंगळवारी दिवसभर मोठ्या संख्येने









