दहावी फिनिक्स चषक फुटबॉल स्पर्धा : फिनिक्स, केएलएस, सेंट पॉल्स, सेंट झेवियर्सचीही आगेकूच
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
फिनिक्स स्पोर्टस् कौन्सिल आयोजित दहाव्या फिनिक्स चषक 13 वर्षांखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनदिवशी कनक मेमोरियल, संत मीरा, इस्लामिया, फिनिक्स पब्लीक, केएलएस, सेंट पॉल्स व सेंट झेवियर्स संघांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करुन विजयी सलामी दिली.
नेहरुनगर येथील कनक मेमोरियल स्कूलच्या फुटबॉल मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्ये÷ हॉकीपटू डॉ. अश्विनी शिंदे, फिफाचे निवृत्त पंच व गोवा एफसीचे प्रमुख प्रशिक्षक बेंजामीन सिल्वा, मुख्याध्यापिका विद्या वगण्णावर, एस. एफ. कलाल, अनुपमा, सरफन्सा, सुभेदार, लक्ष्मेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत विद्या वगण्णावर यांनी केले. डॉ. अश्विनी शिंदे यांना दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख करुन दिल्यानंतर चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
कनक मेमोरियल संघाने केएलई इंटरनॅशनल संघाचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात पवन परमारने 3 गोल तर गणेश भावरने 2 गोल केले. दुसऱया सामन्यात संत मीरा संघाने भरतेश सेंट्रल संघाचा 5-0 असा पराभव केला. रक्षित ए. जी. याने सलग 4 गोल करुन स्पर्धेची पहिली हॅटट्रीक नोंदविली. श्लोक बी. बी. ने 1 गोल केला. तिसऱया सामन्यात इस्लामिया संघाने केएलएस पब्लीक संघाचा 2-0 असा पराभव केला. इस्लामियातर्फे टिपुसुलतान बेपारी, अलमीर बदामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. चौथ्या सामन्यात फिनिक्स पब्लीक संघाने ज्ञान प्रबोधन संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. रुद्रा पाटीलने एकमेव गोल केला. पाचव्या सामन्यात केएलएस संघाने ज्ञान मंदिर संघाचा 3-0 असा पराभव केला. केएलएसतर्फे अनिकेत पाटीलने 2 तर हर्षद कारेकरने 1 गोल केला.
सहाव्या सामन्यात सेंट पॉल्स संघाने जी.जी. चिटणीस संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. सेंट पॉल्सतर्फे महम्मद हुसेनने एकमेव गोल केला. सातव्या सामन्यात सेंट झेवियर्स संघाने कर्नाटक दैवज्ञ संघाचा 9-0 असा पराभव केला. रोशन अब्बास शहाबादने 5 गोल करुन स्पर्धेची दुसरी हॅटट्रीक नोंदविली. अर्क्वीन बडेघरने 2, अजीम ताशिलदार, माहीद भडकली यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला.
शनिवारचे सामने : 1) पोतदार इंटरनॅशनल वि. केएलई इंटरनॅशनल सकाळी 9 वाजता 2) लव्हडेल वि. भरतेश सेंट्रल सकाळी 10 वाजता 3) एमव्हीएम वि. केएलएस पब्लीक सकाळी 11 वाजता 4) मदनी वि. ज्ञान प्रबोधन दुपारी 12 वाजता 5) बाशिबन वि. ज्ञान मंदिर दुपारी 1 वाजता 6) अमृता विद्यालय वि. जी.जी. चिटणीस दुपारी 2 वाजता 7) कर्नाटक दैवज्ञ वि. गुड शेफर्ड दुपारी 3 वाजता.









