Kamal Rashid Khan : वादग्रस्त ट्विटप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता कमाल खान अर्थात केआरके याला बोरिवली कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला मालाड पोलिसांनी अटक केली होती. आज बोरिवली कोर्टात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
काही दिवसांपासून केआरकेला अटक होणार अशी चर्चा सुरु होती. तो जेव्हा मुंबई विमानतळावर आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. केआरके हा सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतो. केआरके हा भारतीय अभिनेता, कथा लेखक, निर्माता आहे. त्यानं सन २००९ मध्ये बिगबॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला होता. तेव्हापासून तो प्रकाशझोतात आला. देशद्रोही नावाच्या सिनेमामुळं तो बॉलिवूडमध्ये चर्चेत आला होता. हा सिनेमाची त्यानं निर्मिती देखील केली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









