Kamal Hassan Bharat Jodo Yatra बॉलीवूड आणि साउथ चित्रपटातील लोकप्रीय अभिनेते आणि मक्कल नीधी मैयाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी ते 24 डिसेंबर रोजी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. कमल हसन आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी त्यांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले असल्याचे सांगितले केले. या संबंधातील माहीती पक्षाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
मक्कल नीधी मैयाम (MNM) पक्षाचे प्रवक्ते मुरली अप्पा यांनी पीटीआयला सांगितले की, “पक्षाचे नेते कमल हसन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रीय राजधानी दिल्लीत राहूल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.” या पायी मोर्चात भाग घेण्याविषयी कमल हसन यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून ही घोषणा केल्याचे ही त्यांनी सांगितले. रविवारी कमल हसन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे एमएनएमच्या प्रशासक आणि कार्यकारिणी आणि जिल्हा सचिवांची बैठक झाली. या बैठकीनंतर भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यावर एकमत झाले असल्याचे कळते. भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावर यामुळे कॉंग्रेस पक्ष आणि कमल हसन यांचा पक्ष एकत्र येतील असे राजकिय जाणकारांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









