शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद शिशुवाटिका, प्राथमिक शाळा कळसुलकर इंग्लिश स्कूल आय बि सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या नुतन वास्तूचे उद्घाटन सोमवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी १९ वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते होणार आहे.यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आजी-आजोबा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला या शाळेच्या १९७८ दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांची खास उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै यांनी केले आहे.









