श्री व्याग्रेश्वर गणपती मूर्तिप्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन सोहळा 23 रोजी
प्रतिनिधी /सांगे
सांगेतील उगे येथील श्री हेमाडदेव सिद्धेश्वर देवस्थानचा वार्षिक कालोत्सव, श्री व्याग्रेश्वर गणपती मूर्तिप्रतिष्ठापनेचा 20 वा वर्धापनदिन, श्री गणेश जयंती उत्सव व श्री कलनाथ मंदिर जीर्णोद्धार वर्धापनदिन सोहळा 19 ते 21 आणि 23, 25 व 26 रोजी साजरा करण्यात येणार आहे.
गुरुवार 19 रोजी सकाळी श्रींस महाभिषेक, आरत्या, तीर्थप्रसाद, दुपारी 12.30 वा. पंचिष्टास नैवेद्य व समराधना, संध्याकाळी रंगपूजा, रात्री 9.30 वा. पारंपरिक कालोत्सव, 10.30 वा. उगे ग्रामस्थांतर्फे गौरी तनय कला संघ, घोणशी नागेशी निर्मित आणि तुळशीदास घोणशीकर प्रस्तुत ‘माय कास्ताद सून वस्ताद’ या कोकणी नाटकाचा प्रयोग होईल.
शुक्रवार 20 रोजी सकाळी धार्मिक विधी, आरत्या, तीर्थप्रसाद व रात्री 10.30 वा. सावडीमळ ग्रामस्थांतर्फे कला चेतना, वळवई आणि राजदीप नाईक निर्मित तसेच श्रीनिका क्रिएशन, नागेशी-बांदोडा प्रस्तुत ‘शुभ टिंगल सावधान’ हे कोकणी विनोदी नाटक सादर करण्यात येईल. शनिवार 21 रोजी सकाळी धार्मिक विधी, आरत्या, तीर्थप्रसाद व श्रींच्या फळाफुलांची पावणी, रात्री 11 वा. देसाईवाडा-बोंबड ग्रामस्थांतर्फे सार्थ कला आविष्कार, आर्ल-केरी निर्मित व प्रशांती शिरोडकर प्रस्तुत ‘गुलुगुलू’ हे कोकणी विनोदी नाटक सादर करण्यात येईल.
सोमवार 23 रोजी श्री व्याग्रेश्वर गणपती मूर्तिप्रतिष्ठापना वर्धापनदिनानिमित्त सकाळी श्रींस महाभिषेक, आरत्या, तीर्थप्रसाद व संध्याकाळी 7 वा. भजन, आरत्या आणि तीर्थप्रसाद होईल. बुधवार 25 रोजी श्री गणेश जयंतीनिमित्त सकाळी धार्मिक विधी, श्रींस महाभिषेक, आरत्या, तीर्थप्रसाद व संध्याकाळी भजन, आरत्या व तीर्थप्रसाद होईल. गुरुवार 26 रोजी श्री कलनाथ मंदिर जीर्णोद्धार वर्धापनदिनानिमित्त सकाळी धार्मिक विधी, श्रींस महाभिषेक, आरत्या, तीर्थप्रसाद व संध्याकाळी भजनांचा कार्यक्रम आणि तीर्थप्रसाद होईल.









