नेसिप्पाया चित्रपटात मुख्य भूमिका
बॉलिवूडची गुणवान अभिनेत्री कल्कि केकलां आगामी काळात तमिळ चित्रपट ‘नेसिप्पाया’मध्ये दिसून येणार आहे. अभिनेत्री या चित्रपटात एका वकिलाची भूमिका साकारत असल्याचे समजते. कल्कि अलिकडेच ओटीटीवर प्रदर्शित चित्रपट ‘खो गए हम कहां’मध्ये दिसून आली होती. आता ती तमिळ चित्रपट ‘नेसिप्पाया’मध्ये स्वत:च्या अभिनयाची जादू दाखवून देणार आहे. अभिनेत्री या चित्रपटात पोर्तुगालमध्ये राहणारी वकील इंदिरा ही भूमिका साकारणार आहे. कल्कि यापूर्वी अजित कुमारचा चित्रपट ‘नरकेंडा पारवई’मध्ये दिसून आली होती. या चित्रपटाद्वारे तिने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण पेले होते. आता ती नेसिप्पाया चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. कल्किचा हा चित्रपट रोमँटिक ड्रामा धाटणीचा आहे. याचे दिग्दर्शन विष्णुवर्धन करतील. आहेत. कल्किसोबत आकाश मुरली देखील मुख्य भूमिकेत असेल.









