वृत्तसंस्था / राऊरकेला
हॉकी इंडिया पुरुषांच्या लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात वेदांता कलिंगा लान्सर्सने दिल्ली पायपर्सचा 5-1 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात कलिंगा लान्सर्स संघातील हॉलंडचा हॉकीपटू थिएरी ब्रिंकमनने दोन गोल केले.
या सामन्यात कलिंगा लान्सर्सतर्फे निकोलास बंद्रुकने 11 व्या मिनिटाला, आर्थर व्हॅन डोरेनने 36 व्या, गुरु साहीबजीत सिंगने 45 व्या मिनिटाला तसेच ब्रिंकमनने 38 व्या आणि 43 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. दिल्ली पायपर्सतर्फे एकमेव गोल कोरे वेअरने 46 व्या मिनिटाला नोंदविला. या विजयामुळे कलिंगा लान्सर्सने स्पर्धेच्या गुणवतक्त्यात सात सामन्यातून 10 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. दिल्ली पायपर्स संघाला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांचा सहभाग आहे.









