वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हॉकी इंडियाच्या आगामी होणाऱ्या हॉकी लीग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ओदिशातील फ्रांचायजींच्या मालकीच्या कलिंगा लान्सर्स संघातील खेळाडूंच्या जर्सीचे अनावरण भुवनेश्वरमध्ये मोठ्या थाटात करण्यात आले.
याप्रसंगी कलिंगा लान्सर्स संघाच्या गीताच्या अधिकृततेची घोषणाही यावेळी करण्यात आली. ओदिशा लान्सर्सच्या हॉकीपटूंना देण्यात येणारी ही जर्सी निळ्या आणि हिरव्या रंगाची असणार असून या जर्सीवर नारंगी आणि पांढऱ्या रंगाचाही समावेश आहे. ओदिशाच्या क्रीडा युवजन खात्याचे मंत्री एस. सुरज यांच्या हस्ते या जर्सीचे अनावरण करण्यात आले. ओदिशाचा बॉलिवूड गायक रितुराज मोहांकीने या संघाच्या गीताचे बोल गायले आहेत.









