प्रतिनिधी / कुंकळ्ळी
कुंकळ्ळीत 24 ते 27 ऑक्टोबर दरम्यान श्री कालीमाता पूजनोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुंकळ्ळी परिसरात वास्तव्य करून असलेले खास करून बंगाली लोक या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करत असतात. यंदा त्यांचे उत्सव आयोजनाचे हे 10 वे वर्ष असून यादरम्यान धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तसेच कुंकळ्ळी, बाळ्ळी, फातर्पा परिसर मर्यादित एकेरी नृत्य आणि गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांत पहिले रु. 1000, दुसरे रु. 700 व तिसरे रु. 500 अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या उत्सवाच्या दरम्यान कुंकळ्ळीत बंगाली कार्यक्रम पाहण्याची संधी लोकांना मिळणार आहे. कुंकळ्ळीत जेथे सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा करण्यात येतो तेथेच श्री कालीमाता पूजनोत्सव होणार आहे. अखेरच्या दिवशी सायंकाळी 5 वा. सांवरकटा नदीपर्यंत मूर्ती विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी 9011147296 वर संपर्क साधावा, असे डॉ. महंतो यांनी कळविले आहे.









