प्रतिनिधी/ बेळगाव
चलवेनहट्टी गावचे जागृत देवस्थान श्री ब्रह्मलिंग देवस्थानचे जीर्णोद्धार कार्य सुरू आहे. या मंदिराचे कळसारोहण वास्तूशांती शुभमुहूर्तावर करण्यात येणार आहे. कळस खरेदी करण्यासाठी देणगी स्वीकारण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रविवार दि. 26 रोजी सकाळी 8 वा. साहाय्यधनासाठी कलशाची टॅक्टरवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. ब्रह्मलिंग मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. ग्रामस्थांनी स्वखुषीने देणगी द्यावी, असे आवाहन ब्रह्मलिंग मंदिर कमिटी तसेच ग्राम पंचायत सदस्यांनी केले आहे.









