उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर पाटबंधारे विभागाकडून कार्यवाही
प्रस्ताव मंजुरीनंतर निधी मिळण्याचा मार्ग सुकर
कोल्हापूर प्रतिनिधी
काळम्मावाडी धरणाच्या गळती काढण्यासाठी निधी लवकरच मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुऊवारी याबाबत ‘व्हिसी’द्वारे आढावा घेऊन यापूर्वी पाठविलेल्या निधी मागणीच्या प्रस्तावातील त्रुटी दूर कऊन फेरप्रस्ताव पाठवावा, त्यानंतर त्याला मंजुरी दिली जाईल, असे निर्देश जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाला दिले. त्यानुसार सायंकाळी फेरप्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला.
काळम्मावाडी (दुधगंगा) धरणाची गळती व घटप्रभा धरणाच्या पडलेल्या भिंतीसंदर्भात आढावा घेण्यासाठी ‘व्हिसी’द्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुंबईहून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदीवडेकर आदी सहभागी झाले होते.
काळम्मावाडी धरणातील गळती काढण्यासाठी सुमारे 80 कोटींच्या निधीची घोषणा स्वातंत्र्य दिनी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुऊवारी बैठक घेतला. यापूर्वी पाठविलेल्या निधी मागणीच्या प्रस्तावात काही त्रुटी असून त्या दूर कऊन फेर प्रस्ताव सादर करावा, त्यानंतर तो मंजूर केला जाईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाला दिले. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून यापूर्वीच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करुन आणखी आवश्यक बाबींचा समावेश कऊन फेरप्रस्ताव सायंकाळीच राज्य शासनाला सादर करण्यात आला.
त्याचबरोबर 2019 ला पडलेल्या घटप्रभा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाबाबतही उपमुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यासाठी 24 कोटींच्या निधीची आवश्यकता असून त्याबाबतचा प्रस्तावही पाटबंधारे विभागाकडून राज्य शासनाला पाठविला.









