डांबरीकरण करण्याची भाजपची मागणी
सावंतवाडी प्रतिनिधी
कलंबिस्त ते शिरशिंगे पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी कलंबिस्त ग्रामस्थांच्या वतीने भाजप तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली . यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, माजी सरपंच बाळू सावंत, अंतोन रॉड्रिक्स, संदेश बिडये ,शरद पास्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अनिल सावंत ,रमेश सावंत, प्रकाश सावंत, आदींच्या सहींचे निवेदन देण्यात आले . त्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. येत्या २६ जानेवारी पर्यंत हा रस्ता डांबरीकरण न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला .









