तलावाची पाणी पातळी सत्तावीस फुटांवर : नागरिकांना दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
वार्ताहर/कळंबा
गेल्या दोन दिवसंपासून सुरू असणाऱ्या सुरू असणाऱ्या संतात धार पावसाने बुधवार सकाळ पासून शहरा लगत असणारा ऐतिहासिक कळंबा तलाव पाचव्यांदा पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. २३ जुलैला यावर्षी पहिल्यांदा तलाव भरून सांडव्यावरून पाणी बाहेर पडले होते, आता ऑक्टोंबर मध्ये पाचव्यांदा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यावरून कोसळणारे पाणी पाहण्यासाठी बुधवारी नागरिकांनी गर्दी केली होती.
सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने कळंबा तलाव चौथ्यांदा भरला होता. त्यापुर्वी तलावातील पाणीपातळी 25 फुटांवर होती. पुन्हा दोन दिवसंपासून सुरू असणाऱ्या पावसाने पाणी पातळी पुन्हा २७ फुटांवर पोहोचली आहे. दरम्यान, गेली 15 दिवस पावसाने उघडीप दिली होती. तरीही तलाव काठोकोठ भरला होता.
बुधवारी सुरू झालेल्या संततधारेने कात्यायनी टेकड्यातून वाहणारे सात नाले ओसंडून वाहू लागल्याने कळंबा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली, परिणामी पाचव्यांदा बुधवारी तलाव ओव्हरफ्लो झाला. अशा स्थितीत नागरीक पर्यटकांनी धोका पत्करू नये, तसेच पाणी पाहताना दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिका, कळंब्या चे सरपंच सागर भोगम व उपसरपंच राजश्री टोपकर तसेच करवीर पोलिसांनी केले आहे.









