कोल्हापूर: कोल्हापूर शहरात पावसाने उसंत दिली असले तरी अधून मधून येणाऱ्या सरीने आज दुपारच्या सुमारास कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. सध्या पावसाचा जोर नसला तरी कळंबा धरण भरल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, कळंबा तलाव ओव्हर फ्लो झालेले कळताच पर्यटकांनी तलावाकडे धाव घेतली आहे.
हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेला परिसर, देशी विदेशी पक्षांची कानी पडणारी साद, रंगीबेरंगी रानफुलांनी बहरलेले पठार, त्यामध्ये बागडणाऱ्या फुलपाखरांचे थवे, कोसळणारा झिम्माड पाऊस असे निसर्गसौंदर्याचे कोंदण लाभलेला कळंबा तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे (Rain In kolhapur) कळंबा तलाव तुडूंब भरला आहे. त्यामुळे शहरासह, कळंबा, पाचगावचा पाणी प्रश्न निकालात निघाला आहे. कात्यायनी डोंगरांमधून तलावाला मिसळणारे अनेक ओढे-नाले आणि जयंती नदी भरून वाहत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
Previous Articleत्याने स्वतःला मारून ट्रक लुटल्याचे सांगितले, पोलिसांनी खाक्या दाखवताच आजऱ्यातील लुटीचा बनाव उघड
Next Article मराठा बँकेतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार









