कुडाळ –
साळगांव येथील प.पू. सद्गुरु श्री काका खानोलकर महाराज यांचा 28 वा पुण्यतिथी उत्सव 8 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. साळगांव येथील त्यांच्या समाधी मंदिरात हा उत्सव होणार आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, पूजा व सकाळी १०.४५ ते दुपारी १२.४५ वाजेपर्यत प.पू.नामदेव महाराज भक्त मंडळ यांचा हरीपाठ, करुणात्रिपदी व भजन तसेच दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद व रात्री भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीप्रकाश (अरविंद) प्रभुखानोलकर यांनी केले आहे.









