कराड / प्रतिनिधी :
अतिशय उत्कंठावर्धक वातावरणात पार पडलेल्या कराड बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व रयत कारखान्याचे अध्यक्ष अँड. उदयसिंह पाटील यांच्या लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलने दहा जागा वर विजय मिळवत बाजार समितीवरील आपली सत्ता कायम राखली. तर आमदार बाळासाहेब पाटील व कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेलला सहा जागांवर समाधान मानावे लागले.
आज सकाळी मतमोजणी प्रारंभ झाल्यापासून विजयाचे पारडे कधी या पॅनलकडे तर कधी त्या पॅनलकडे झुकत होते. त्यातच सोसायटी मतदारसंघांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याने या मतदारसंघात दोन्ही पॅनलच्या जागा निवडून आल्या. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही पॅनेलच्या समर्थकांनी विजयाची उधळण गुलालाची उधळण केली होती. या निकालानंतर काका-बाबा गटाने प्रचंड जल्लोष केला. काका बाबा गटाला उत्तरमधून धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांची साथ मिळाली आहे.
लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
सोसायटी मतदार संघ- विजयकुमार कदम 886 मते, दीपक उर्फ प्रकाश पाटील 898, सोसायटी महिला प्रवर्ग- इंदिरा जाधव पाटील 914, सोसायटी इतर मागास प्रवर्ग
सर्जेराव गुरव 922, सोसायटी भटक्या जमाती -संभाजी काकडे 924, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ -संभाजी चव्हाण 928, राजेंद्र चव्हाण 937, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल -शंकर इंगवले 972, ग्रामपंचायत अनुसूचित जाती – नितीन ढापरे 943, व्यापारी अडते गट जयंतीलाल पटेल 259, जगन्नाथ लावंड 255, हमाल मापाडी गणपत पाटील बिनविरोध.
शेतकरी विकास पॅनेल-सोसायटी सर्वसाधारण -जगदीश जगताप 900, मानसिंगराव जगदाळे 891, दयानंद पाटील 900, उद्धवराव फाळके 989, विनोद जाधव 907, सोसायटी महिला प्रवर्ग-रेखाताई पवार 926.









