Kaju Barfi: सणासुदीच्या घरी प्रत्येकाच्या घरी वेवेगळे पदार्थ तयार केले जातात.बाजारातही मिठाईचे असंख्य प्रकार पाहायला मिळातात.यामध्ये काजू बर्फी ही सर्वत्र पाहायला मिळते. जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडीचा गोड पदार्थ आहे.म्हणूनच आज आपण ही काजू बर्फी घरच्या घरी कशी बनवायची हे जाणून घेऊया.
काजू बर्फीसाठी लागणारे साहित्य
100 ग्रॅम काजू तुकडा
एक नारळ
दोन वाट्या साखर
अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स
दोन चमचे तूप
चांदीचा वर्ख
कृती
सर्वप्रथम काजू थोडा वेळ पाण्यात भिजत घाला. यानंतर नारळ खरडवून घ्या.आणि वाटून घ्या. भिजवलेला काजूही वाटून घ्या. यानंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात खोबरे, काजू व साखर एकत्र करा. मध्यम आचेवर मिश्रण ढवळत रहा .मिश्रण दाटसर होत आले की त्यात व्हॅनिला इसेंस घाला.आणि कडेने तूप सोडा मिश्रण चांगले घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत ओता आणि थापा.आणि त्यावर चांदीचा वर्ख लावा. नंतर त्याचे आवडीनुसार काप करा.तयार आहे काजूची खमंग बर्फी.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









