अजय देवगणकडून निर्मिती
मागील वर्ष भयपटांसाठी खास ठरले होते. अजय देवगणचा शैतान हा चित्रपट आणि मग मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळविले होते. त्यानंतर स्त्राr 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. चालू वर्षात देखील अनेक भयपट प्रदर्शित होणार आहेत. या यादीत काजोलचा चित्रपट देखील सामील आहे.
काजोल एका सुपरनॅचरल थ्रिलर धाटणीच्या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव मा असून याची निमिर्ती अजय देवगणकडून केली जात आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी करण्यात आले असून याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.









