कागल / प्रतिनिधी
Kagal Suicide News : कागल येथील लक्ष्मी टेकडीवरील झाडाला एका अल्पवयीन युवतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.अनिता मारुती शिंदे (वय 16)असे त्या युवतीचे नाव आहे.ती रविवारपासून घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती.ही आत्महत्या की घातपात याचा पोलीस तपास करत आहेत.
जत (जि. सांगली) येथील काही कुटुंब उदरनिर्वाहाच्या निमित्ताने लक्ष्मी टेकडी येथे राहत आहेत.अनिताही आपल्या कुटुंबासोबत तेथे राहत होती.रविवार दि. 17 रोजी ती कोणालाही कल्पना न देता घरातून निघून गेली.याबाबतची फिर्याद अनिताच्या आईने कागल पोलीस ठाण्यात दिली होती.सर्वत्र शोध सुरू असताना लक्ष्मी टेकडीवरील एका झाडाला तिचा मृतदेह लोंबकळत असलेल्या अवस्थेत आढळून आला.
कागलचे पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव,सहायक निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह विच्छेदनाकरिता कागल ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









