जिल्हा स्पर्धेसाठी पात्र, मुलींच्या खो-खो संघाला उपविजेतेपद
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खाते व केएसआरपी मच्छे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात शिवाजी हायस्कूल-कडोली संघाने उचगाव विभागीय संघाचा 7 गुणांनी पराभव करुन तालुकास्तरीय विजेतेपद पटकाविले. या संघाची जिल्हा पातळीवर निवड झाली असून मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले.
केएसआरपी मच्छे येथील मैदानावर घेण्यात आलेल्या या खो-खो स्पर्धेत शिवाजी हायस्कूल कडोली संघाने पहिल्या सामन्यात बागेवाडी संघादरम्यान झाला. या सामन्यात या संघाने एकतर्फी विजय संपादन केला. उपांत्यफेरीच्या सामन्यात कडोली संघाने मच्छे संघाचा 5 गुणांना पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीचा सामना उचगाव विभागीय संघाबरोबर झाला. या अंतिम सामन्यात कडोली संघाने 7 गुणांनी विजय मिळवून स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविले.
या विजयी संघात कुणाल चौगुले, शुभम चौगुले, दक्ष पाटील, अनिरुद्ध मायाण्णा, कमलेश फडके, साहील चौगुले, अनिश मायाण्णा, साईनाथ हदगल, दयानंद पाटील, साई कुटे, प्रज्वल अष्टेकर आदी खेळाडूंचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे मुलींच्या खो-खो संघाने पहिला सामना मच्छे संघाबरोबर खेळला. त्यात 4 गुणांनी विजय संपादन केला. उपांत्य फेरीचा सामना मुचंडी संघाविरुद्ध झाला. त्यात कडोली हायस्कूल संघाने 4 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश घेतला. अंतिम फेरीत मात्र गौंडवाड संघाने शिवाजी हायस्कूल कडोली संघाचा 6 गुणांनी पराभव करुन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या मुला-मुलींच्या खो-खो संघाला प्रशिक्षक एन. आर. पाटील यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभत आहे.









