वार्ताहर/कडोली
कडोली येथे येत्या शनिवारी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खाते आणि जलद कृती दलाच्या जवानांकडून पथसंचलन करण्यात आले. शनिवारी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन सोहळा पार पडणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे आणि पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक तसेच सहकारी व जलद कृती दलाचे जवान या पथसंचलनात सहभागी झाले होते.









