वृत्तसंस्था / बॅस्टेड (स्वीस)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या अर्जुन कढे आणि विजय सुंदर प्रशांत यांचे दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले.
पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या अलबेनो ओलीव्हेटी आणि जर्मनीच्या हेन्ड्रीक जिबेन्स या तृतिय मानांकित जोडीने अर्जुन कढे व विजय सुंदर प्रशांत यांचा 7-5, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा उपांत्य फेरीचा सामना 85 मिनिटे चालला होता. गेल्या वर्षी कढेने अलमेटी खुल्या टेनिस स्पर्धेचे बोलीपल्ली समवेत पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळविले होते.









