कॅम्प येथील घटनेत कमानीचे नुकसान
बेळगाव : कॅम्प परिसरातील अवजड वाहतूक रोखण्यासाठी कॅन्टोन्मेंटने उभारलेल्या लोखंडी कमानीवर कदंबा बस आदळली आहे. रविवारी ही घटना घडली असून त्यामुळे कमानीचे नुकसान झाले आहे. कॅम्प परिसरातील अवजड वाहतूक रोखण्यासाठी कॅन्टोन्मेंटच्यावतीने ग्लोब चित्रपट गृहाजवळ लोखंडी कमान उभारली आहे. रविवारी या कमानीवर गोव्याची कदंबा बस आदळल्याने कमानीचे नुकसान झाले. त्यामुळे बस वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांकडे सोपविण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला नाही. वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले









