गोकाकमध्ये कॅन्टीनसाठी जागा निश्चितीसंदर्भात चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी शनिवारी मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांची भेट घेतली. गोकाक शहरामध्ये माजी सैनिकांसाठी कॅन्टीन मंजूर करण्यात आले असून यासाठी जागा निश्चितीसंदर्भात चर्चा करण्यात आली. गोकाक परिसरात सैन्यदलात कार्यरत असलेले व निवृत्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांना कॅन्टीनसाठी बेळगावला यावे लागते. परंतु गोकाक शहराबाहेर कॅन्टीनची सोय व्हावी, अशी मागणी संरक्षण मंत्रालयाकडे करण्यात आली होती. त्यांनी ही मागणी मान्य करत परवानगी दिली. गोकाक शहरात जागेची पाहणी करून केंद्र सरकारला लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्याची मागणी कडाडी यांनी ब्रिगेडीयर मुखर्जी यांच्याकडे केली.









