सावंतवाडी प्रतिनिधी
राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे येथे 19 ते 21 मार्चला ठाणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू निवड चाचणी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे पुरुष व महिलांचे संघ पाठवण्यात येणार आहेत . यासाठी आज सावंतवाडी विश्रामगृह येथे जिल्ह्यातील आठही तालुक्यातील कबड्डी खेळाडू ,पंच आयोजक यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने खेळाडू पाठवून एक शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर व सचिव विकास उर्फ विकी केरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृष्णा सावंत ,अजय जाधव, यांनी जिल्हा कबड्डी हौशी असोसिएशनच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडू ,पंचांची बाजू स्पष्ट केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जावेद शेख,नंदन वेंगुर्लेकर ,अनिल हळदीवे ,जितेंद्र म्हापसेकर ,भूपेश राणे,दीनानाथ बांदेकर, प्रियांका बोरगावकर, रुपेश वाळके, रुपेश केळुसकर ,वासिम शेख ,विश्राम नाईक, नरेंद्र डोंगरे, दीपक चव्हाण, सुरज गवस ,विशाल देसाई ,कृष्णा सावंत ,महेश डिचोलकर ,उदय यादव आदी उपस्थित होते.









