आशुतोष अन् मोना यांची वेबसीरिज
अभिनेत्री मोना सिंह लवकरच आणखी एक वेबसीरिज ‘काला पानी’मध्ये दिसून येणार आहे. आशुतोष गोवारिकर आणि मोना सिंह यांच्या या या सरवाइवल ड्रामा वेबसीरिजचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या सस्पेन्स थ्रिलर सीरिजचा ट्रेलर पाहून चाहते उत्सुक झाले आहेत. या ट्रेलरमध्ये अंदमान आणि निकोबार बेटसमुहाच्या कालापानीमध्ये लोक कसे जिवंत राहतात हे दाखविण्यात आले आहे. याच्या कहाणीला अनेक रहस्यांची किनार आहे. बेटवर काही गडबड झाल्याने अराजकता फैलावते, यामुळे अंदमान निकोबारवर राहणारे लोक अडकून पडतात आणि यानंतर उर्वरित जगाशी असलेला संपर्क तुटतो असे ट्रेलरमध्ये दिसून येते. ‘काला पानीच्या भिंती बंद होत आहेत, ही तुमच्या जिवंत राहण्याच्या कौशल्याचे परीक्षण करण्याची वेळ आहे’ असे ट्रेलरच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही वेबसीरिज 18 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. समीर सक्सेना आणि अमित गोलानी यांचे याचे दिग्दर्शन केले आहे. तर मोना सिंह हिच्यासोबत आशुतोष गोवारिकर, आरुशी शर्मा, अमेय वाघ, राधिका मेहरोत्रा, चिन्मय मांडलेकर आणि पौर्णिमा इंद्रजीत यासारखे अनेक कलाकार यात दिसून येणार आहेत.









