विविध कंपन्यांमध्ये बजावली सेवा 5 वर्षासाठी नियुक्ती
मुंबई
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजवर के. व्ही. कामत यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते पुढील पाच वर्षे या पदावर राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्तीला सदरच्या बैठकीमध्ये संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे के व्ही कामत हे पुढील पाच वर्षासाठी स्वतंत्र संचालक म्हणून कंपनीत रुजू होणार आहेत. 1971 मध्ये के. व्ही. कामत यांनी आपल्या करिअरची सुरुवात आयसीआयसीआयमधून केली होती. निवृत्तीपूर्वी ते व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून आयसीआयसीआयमध्ये कार्यरत होते. त्यांनी आशियाई विकास बँक, इन्फोसिस अशा विविध संस्थांमध्येदेखील काम केले आहे.
रिलायन्सकडून मेट्रोचे अधिग्रहण
मेट्रो एजीस कॅश आणि कॅरी व्यवसायाचे रिलायन्स इंडस्ट्रिजने अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रिलायन्सने 4060 कोटी रुपये मोजले असल्याचे सांगितले जाते.









