बेळगाव : के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी चषक निमंत्रीतांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल स्पर्धा सोमवार दि. 17 फेब्रुवारी पासून युनियन जिमाखाना मैदानावर सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला देशातील नामवंत टेनिसबॉल क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत. सोमवारी प्रदर्शनीय सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेत प्रदर्शनीय सामने पत्रकार इलेव्हन, अॅडव्होकेट इलेव्हन, एलएनटी, पोलीस इलेव्हन, प्रोफेसर इलेव्हन यांच्या खेळविले जाणार असून विजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रमुख स्पर्धेत मुंबई, गुजरात, पुणे, गोवा, सावंतवाडी, मिरज, कोल्हापूर, रायगड, तामिळनाडू, केरळ, मंगळूर येथील संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेत भारतातील दिग्गज टेनिसबॉल क्रिकेटर्स कृष्णा सातपुते, भरत मदने, इजाज कुरेशी, मुना शेख, उस्मान पटेल, अमरीश खान, विजय पावले, सनम सरकार, करण अंबाला, फरजिन काझी, रजन मुंडे, दाजी नाईक, गोपाल भट्टा, सनम साळगावकर आपला खेळ दाखविणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघांना 2 लाख रुपये रोख, आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 1 लाख रुपये रोख, आकर्षक देवून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक बक्षीसे, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, इम्पॅक्ट खेळाडू व मालिकावीर अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.









