क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मंगाई स्पोर्टस क्लब आयोजित पहिल्या पावसाळी रबरबॉल क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनदिवशी के. आर. शेट्टी निपाणी संघाने शेवटच्या बादपध्दतीच्या सामन्यात साईराज ब चा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली. श्रेयश माकतीव•र याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सीन डेपो मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या लिक कम नॉकआऊट रबरबॉल उद्घाटनप्रसंगी महेश फगरे, प्रणय शेट्टी, गजानन फगरे, अमर सरदेसाई, नासिर पठाण आदी मान्यवरांच्याहस्ते यष्टीचे पूजन करून करण्यात आले. उद्घाटन सामन्यात साईराज ब ने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 3 गडी बाद 31 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी निपाणीने 2.5 षटकात 2 गडी बाद 32 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात एस. जी. स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 5 गडी बाद 45 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना आंबेवाडी संघाने 4.2 षटकात 2 गडीबाद 46 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला.
तिसऱ्या सामन्यात आंबेवाडी सी.सी संघाने 5 षटकात 6 बाद 41 धावा केल्या. प्रत्युतरादाखल खेळताना के. आर. शेट्टी संघाने 4 षटकात 2 गडीबाद 42 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. चौथ्या सामन्यात एस. जी. स्पोर्ट्सने 5 षटकात 8 बाद 38 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज ब ने 4.5 षटकात 40 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. पाचव्या सामन्यात आंबेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकात 2 गडीबाद 36 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज ब ने 3 षटकात 3 गडीबाद 39 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. शेवटच्या बाद पध्दतीच्या सामन्यात के. आर. शेट्टीने 4 षटकात 3 बाद 40 धावा केल्या. त्यात अभिजीतने 25 धावा केल्या. साईराजतर्फे कल्पेशने 6 धावात 2 तर हरिशने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज ब ने 4 षटकात 2 बाद 35 धावाच केल्या. लल्ला एस.ने. 14 धावा केल्या. के. आर. शेट्टीने शफीक व श्रेयस प्रत्येकी 1 गडी बाद केला.









