बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित साईराज चषक 13 वर्षांखालील अंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून केआर शेट्टी लायाजने आनंद अकादमीचा 8 गड्यांनी तर निना क्रिकेट अकादमीने युनियन जिमखानाचा 59 धावांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. यश चौगुले, अमीर पठाण यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हिक्सीन डेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आनंद अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 23.1 षटकात सर्वगडी बाद 97 धावा केल्या. त्यात आरूष देसूरकरने 3 चौकारासह 23, अमीर पटवेगारने 14 तर अंगद दळवीने 13 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे यश चौगुलेने 10 धावात 4, स्वयंम खोतने 2 तर मंदार कुट्रे व गौरव परिट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी लायाजने 14.4 षटकात 2 गडी बाद 100 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात स्वयंम खोतने 1 षटकार 7 चौकारासह 49 तर आरूष पाटीलने 13 धावा केल्या. आनंदतर्फे आरती कदम व कबीर पठाण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या सामन्या निनाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडी बाद 158 धावा केल्या. त्यात अजय लमाणीने 2 षटकार, 7 चौकारासह 59 तर कृष्णा पाटीलने 26 तर अरिहंत तुबाकीने 13 धावा केल्या. जिमखानातर्फे विश्रुत कुंदरनाडने 3, तर साईराज पावले, सलमान व विरेंद्र यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना जिमखान्याचा डाव 24.4 षटकात 99 धावात आटोपला. त्यात सत्तार एस. एम. व अंश यांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. निनातर्फे अमीर पठाणने 4, श्रेयस पाटीलने 2, आर्जान व हर्षा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.









