बेळगाव : के. आर. शेट्टी किंग्ज स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर.शेट्टी निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या प्रदर्शनिय सामन्यात के. आर. शेट्टी संघाने नील स्पोर्ट्सचा 4 गड्यांनी तर दुसऱ्या सामन्यात ग्रामीण लेजंट संघाने सिटी लेजंट संघाचा 9 गड्यांनी पराभव करुन विजेतेपद मिळविले. युनियमन जिमखाना मैदानावरती खेळविण्यात आलेल्या मंगळवारच्या सामन्यात नील स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 101 धावा केल्या. त्यात तनिष्क नाईकने 4 षटकार 4 चौकारांसह 52 धावा केले. के. आर. शेट्टीतर्फे संतोष सुळगे-पाटीलने 20 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी संघाने 8 षटकात 6 गडी बाद 102 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात अझर अशरफीने 18 चेंडूत 3 षटकार 3 चौकारांसह 38, सादीक तिगडीने 2 षटकार 1 चौकारासह 30 धावा केल्या. नील बॉईजतर्फे स्वयंम अप्पण्णावरने 4 गडी बाद केले. दुसऱ्या प्रदर्शनिय सामन्यात बेळगाव सिटी लेजंट संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 गडी बाद 92 धावा केल्या. त्यात प्रणय शेट्टीने 3 षटकार 2 चौकारांसह 38 धावा केल्या. ग्रामीण लेजंटतर्फे उमेश गोरलने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ग्रामीण लेजंटने 8.4 षटकात 1 गडी बाद 93 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात उमेश गोरलने 3 षटकार 2 चौकारांसह 42 तर डॉ. संतोषने 2 षटकार 1 चौकारांसह 30 धावा केल्या. सामन्यानंतर दोन्ही प्रदर्शनीय संघातील खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक देवून गौरविण्यात आले.









