पहिले बक्षीस 2 लाख, उपविजेत्याला 1 लाख
बेळगाव : के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी चषक निमंत्रीतांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल स्पर्धा सोमवार दि. 17 फेब्रुवारी पासून युनियन जिमाखाना मैदानावरती सुरुवात होणार आहे. सदर स्पर्धा होतकरु टेनिसबॉल क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी के. आर. शेट्टी फौंडेशनचे संचालक प्रणय शेट्टी यांनी सुरु केली आहे. गतवर्षी ही स्पर्धा छोट्या प्रमाणात केली होती. पण यावर्षी अखिल भारतीय स्तरीय निमंत्रीतांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, केरळ येथील नामवंत संघांना निमंत्रीत करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघांना 2 लाख रुपये रोख, आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 1 लाख रुपये रोख, आकर्षक देवून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक बक्षीसे, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, इम्पॅक्ट खेळाडू व मालिकावीर अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. तरी इच्छुक संघांनी आपली नावे 15 फेब्रुवारीपूर्वी नोंदवावीत. अधिक माहितीसाठी नासीर पठाण, अनंत माळवी, विठ्ठल व रब्बानी दफेदार यांच्याशी संपर्क साधावा, असे स्पर्धा पुरस्कर्ते प्रणय शेट्टी यांनी केले.









