नरेंद्र मांगोरे सामनावीर, संदीप मकवाना मालिकावीर
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
भेदक गोलंदाजीच्या जोरावर अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी किंग्स निपाणी संघाने एवायएम जयसिंगपूर संघाचा 5.2 षटकात 2 गडीबाद 46 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकून पहिला पावसाळी रबर बॉल मंगाई चषक पटकाविला. नरेंद्र मांगोरे सामनावीर तर संदीप मकवाना मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर बुधवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात के. आर. शेट्टी किंग्स संघाने बी. एस. भवानीनगर संघाच 8 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात भवानीनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 4 गडीबाद 52 धावा केल्या. गणेश बस्तवाडकरने 3 षटकार 1 चौकारसह 25 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले. के. आर. शेट्टीतर्फे अनिकेत लोहारने 11 धावात 3 तर श्रेयसने 1 गडीबाद केला. प्रत्यत्तरादाखल खेळताना के. आर शेट्टी संघाने 4.5 षटकात 2 गडीबाद 57 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला त्यात अभिजीत सादगुडे 3 षटारासह नाबाद 11, एम. के. कांबळे नाबाद 14, चेतन पांगिरेने 10 धावा केल्या. भवानीनगरतर्फे विकी, पवन शर्मा, भूषण यानी प्रत्येकी 1 गडीबाद केला. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात एवायएम जयसिंगपूरने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 2 गडीबाद 81 धावा केल्या. त्यात संदीप मकवानाने 8 षटकार 1 चौकारासह 22 चेंडूत 59 तर अनिकेत मानेने 10 धावा केल्या. एसआरएसतर्फे संतोषने 19 धावात 2 गडीबाद केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस हिंदूस्तानने 6 षटकात 3 गडीबाद 59 धावा केल्या. त्यात संतोषने 11 तर महेंद्रने 10 धावा केल्या. एवायएमतर्फे साहील मोमीन यानी प्रत्येक 1 गडीबाद केला.

अंतिम सामन्यात एवायएम जयसिंगपूरने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 5 गडीबाद 41 धावा केल्या. त्यात संदीप मकवानाने 20 तर साहील मोमीने 11 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे नरेंद्र मांगोरे यानी 4 धावात 2 गडीबाद केल्या. प्रत्युतरादाखल खेळताना के. आर. शेट्टी किंग्स संघाने 5.2 षटकात 3 गडीबाद 45 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला त्यात नरेंद्र मांगोरे 2 चौकारासह नाबाद 17 तर चेतन पांगिरेने 17 धावा केल्या. एवायएमतर्फे साहील मोमीन 25 धावात 2 तर संदीप मकवानाने 1 गडीबाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहूणे महेश फगरे, अमर सरदेसाई, चंदन कुंदरनाड, सारंग राघोचे, प्रणय शेट्टी व नासिर पठाण यांच्याहस्ते विजेत्या के. आर. शेट्टी संघाला 51 हजार रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या जयसिंगपूर संघाला 25 हजार रूपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज गणेश बस्तवाडकर भवानीनगर, उत्कृष्ट गोलंदाज श्रेयस मातीव•र, के. आर. शेट्टी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भूषण चंदगडकर भवानीनगर, उत्कृष्ट संघ बबलू स्लॅमजर, मालिकावीर संदीप मकवाना जयसिंगपूर यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून सुनील पाटील कोल्हापूर, अनंत माळवी, स्कोरल म्हणून गणेशने काम केले. स्पर्धेचे समलोचन आरीफ बाळेकुंद्री, अभिजीत पालेकर, नासीर पठाण यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनंत माळवी व प्रसाद नाकाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
बेळगाव शहरात प्रथमच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा
मुंबई व पुणे या ठिकाणी पावसाळी हंगामात रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळल्या जातात. त्याच धरतीवरती बेळगाव शहरात प्रथमच प्रसाद नाकाडी व अनंत माळवी यानी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरूवात करून नविन पायगंडा घातला आहे. यामुळे पावसाळ्यातही क्रिकेट पासून वंचित राहावे लागत नाही. सतत क्रिकेट खेळण्यास मुबा दिली जात आहे. बेळगावात प्रथमच सुरू केलेल्या या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे.









