बेळगाव :
के. के. कोप क्रॉसजवळ बेकायदा दारू विकणाऱ्या एका युवकाला हिरेबागेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळून 4 लिटर 140 मिलि दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
शेखर हणमंत तळवार (वय 47) राहणार के. के. कोप असे त्याचे नाव आहे. कोळीकोप्पजवळील के. के. कोप क्रॉसजवळ बसथांब्याच्या पाठीमागे दारू विकताना हिरेबागेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 90 एमएलचे एकूण 46 टेट्रापॅक जप्त करण्यात आले आहेत. त्यांची किंमत 1 हजार 840 रुपये इतकी आहे.









